HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…म्हणून राज ठाकरेंनी पवारांच्या नादी न लागता विधानसभा स्वबळावर लढवावी !

मुंबई | “आगामी विधानसभा निवडणूक ही मनसेसाठी शेवटची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या नादाला न लागता यंदाची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी”, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. “विधानसभा निवडणुकांच्या रूपाने चालून आलेली अशी सुवर्णसंधी राज ठाकरेंना पुन्हा पुन्हा मिळणार नाही”, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी (४ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आगामी विधानसभा निवडणूक ही मनसेसाठी आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठीची शेवटची सुवर्णसंधी आहे. राज ठाकरे यांनी जर या संधीचा योग्य वापर करून घेतला नाही तर त्यांना अशी संधी पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी शरद पवारांच्या नादी न लागता यंदाची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी”, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी यांनी व्यक्त केले आहे. “यंदाच्या विधानसभेसाठी मनसेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत यावे यासाठी शरद पवार प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांचे न ऐकता मनसेने यंदाची विधानसभा स्वबळावर लढवावी”, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Related posts

राम मंदिर प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसचा हस्तक्षेप !

News Desk

#Results2018 : तेलंगणामध्ये टीआरएसने राखली सत्ता

News Desk

अंतराळात भारताचे सर्जिकल स्ट्राइक, ‘मिशन शक्ती’ला मोठे यश

News Desk