HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार, सूत्रांची माहिती

मुंबई | लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे ८ ते ९ प्रचार सभा देखील घेणार आहे. सोलापूर, नांदेड आणि  सातारा, मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणेसह अन्य ठिकाणी मनसेकडून स्वतंत्र सभा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळणार आहे.

राज ठाकरे थेट आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित न राहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचे नियोजन पक्षाकडून करण्यात येत आहे. गुढी पाडवा मेळाव्यामध्ये अधिकृतरित्या याबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेच्या १३ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला लोकसभा लढवणार नसल्याचे सांगत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी निवडणुकीत भाजपला मतदान करू नका असा प्रचार मनसे कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.

 

 लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता

  • सातारा-उदयनराजे भोसले
  • सोलापूर – सुशिलकुमार शिंदे
  • नांदेड – अशोक चव्हाण
  • ठाणे- आनंद परांजपे
  • नाशिक – समीर भुजबळ
  • पिंपरी-चिंचवड- पार्थ पवार
  • बारामती – सुप्रिया सुळे
  • उत्तर मुंबई – ऊर्मिला मातोंडकर
  • ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
  • उत्तर मध्य मुंबई – प्रिया दत्त

 

Related posts

मनमोहन सिंग यांचे सरकार माओवाद्यांनी नाही, तर जनतेने उलथवले | ठाकरे

News Desk

#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

News Desk

जेव्हा उदयनराजे डंपर चालवतात…

News Desk