HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

नांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली सभा ?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रचार करणार असल्याचे म्हटले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरे यांची पहिली सभा नांदेड येथे शुक्रवारी (१२ एप्रिल) होणार आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणुका लढविणार नसली तरी आपण भाजप विरोध प्रचार करणार असल्याचे राज ठाकरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.

यंदा नांदेड मतदारसंघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप पाटील-चिखलीकर यांचा सामना होणार आहे. नांदेडमधील मुंडा मैदान, कृषी मार्केट येथे १२ एप्रिलला संध्याकाळी ५ च्या सुमारास राज ठाकरे यांची सभा पार पडेल अशी माहिती मिळत आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध पुरावे देत पंतप्रधान मोदींवर आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आता नांदेडच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Related posts

PM Modi in Shirdi LIVE UPDATES | विविध विकासकामांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, मोदी शिर्डी दौ-यावर

News Desk

#MeToo : परराष्ट्र मंत्री एम.जे.अकबर यांनी दिला राजीनामा

News Desk

आपच्या ४१ आमदारांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी दाखल

News Desk