HW News Marathi
राजकारण

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (२८ मे) कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरीही राजकीय वर्तुळात याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर आता येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे, राजू शेट्टी यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट देखील विधानसभेच्या राजकीय समीरकरणांसाठी असू शकते अशी चर्चा आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणे ही तर भाजपची खासियत !

News Desk

कार्यकर्त्यांनी एक्झिट पोल, अफवांमुळे घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही !

News Desk

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आजी, माजी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

News Desk