HW News Marathi
राजकारण

“मुख्यमंत्र्यांनी मंडळ, दंही हंडी, राजकीय भेटी आणि…”, आदित्य ठाकरेंचे गंभीर आरोप

मुंबई | “आपले मुख्यमंत्री मंडळ, दंही हंडी मग नंतर राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून दुसरे काहीही केले नाही”, असा गंभीर आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टाटा एयरबस प्रकल्प (Tata Airbus Project) गुजरातला गेल्यावर केली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी आज (28 ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदे-फडणवीस सरकारवर ‘टाटा एयरबस’ प्रकल्पाच्या मुद्द्यांवरून सडकून टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आता जर आपण बघितले, तर आपले मुख्यमंत्री मंडळ, दंहीहांडी. यानंतर राजकीय भेटी आणि फोडाफोडी हे सोडून दुसरे काहीही केले नाही. जसे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आपल्या राज्यात आले. तर ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. इथल्या उद्योजकांची चर्चा केली. तसेच गेल्या तीन महिन्यामध्ये मला तुम्ही एक गोष्ट सांगा की, आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन असे कुठचे काही केले आहे, कुठेही नाही केले,” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “जे उद्योग आपल्या राज्यात आहेत. ते सुद्धा राज्याबाहेर निघून जात आहेत. आपण बघितले असे की या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास बसलेला नाही. म्हणून प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येणार होता. प्रत्येक गुंणतवणुकी जी आपल्या राज्यात येणार होती. ती आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहे.”

“महाराष्ट्रानी पहिल्यांदा 80 हजार कोटी गुंतवणूक राज्यात आणण्याचे करार आपण सही केलेली आहे. तेव्हा देखील हेच सरकार होते, महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार होते. तरी डबल इंजिन चालू होते. मग, हे गद्दार सरकार आल्यानंतर एक इंजिन फेल का?, गेले. म्हणजे महाविकासआघाडीचे केंद्रबरोबर चांगले चालले होते,” असा टोलाही आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लावला आहे.

संबंधित बातम्या

“खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही”, आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर बोचरी टीका

 

 

Related posts

RamMandir : भीतीपोटी अयोध्येतून हजारो मुस्लिमांचे स्थलांतर

News Desk

आज महाविकास आघाडीचा महामोर्चा; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Aprna

शरद पवारांनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna