HW News Marathi
राजकारण

राम नव्हे हा तर रावण । मनसे

मुंबई । महिलांबदल भाजपचे आमदार राम कदम यांनी बेताल विधान केल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. घाटकोपर येथे दहीहंडी उत्सवात उपस्थित गोविंदांशी बोलताना कदमांनी वादग्रस्त विधान केले.

मनसेच्या पोस्टरमध्ये नेमके काय म्हटले

व्हा रे व्हा भाजप तुमचे सरकार, महिलांचा मांडला तुम्ही इथे बाजार, माय भागिनी पळवणार तुमचे आमदार, तुम्ही सांगा मुख्यमंत्री साहेब या मुली पळविणा-यांच्या कटात सामिल आहे का भाजप सरकाक ???

राम कदमांचे आवाहन

“तुमचे आईवडील म्हटले, साहेब आम्हालाही पोरगी पसंत आहे,तर काय करणार मी? तिला पळवून तुमच्याकडे आणणार, असे विवादीत विधान केले.

राम कदमांच्या या वक्तव्याचा मनसेने पोस्टर लावून खरपूस समाचार घेतला आहे. या पोस्टरमध्ये “राम नव्हे रावण ! ” असे म्हटले आहे.

राम कदमांच्या विधानावर भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मनसेच्या पोस्टरचे आता कदम कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणे औसुक्याचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BMC Election 2022: 53 ओबीसींसाठी आरक्षित वॉर्ड कोणते?, शिवसेनेच्या दिग्गजांचे वॉर्ड आरक्षित

Manasi Devkar

मुलुंडमध्ये भाजपच्या चिन्हावर शाई लावल्याने गोंधळ

News Desk

ठाकरे गटाला मोठा धक्का! शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Aprna