HW Marathi
राजकारण

राम मंदिर अयोध्येत नाही तर काय मक्का मदिनेत होणार ?

अहमदाबाद | लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या तसा राम मंदिराचा मुद्दा अधिकच जोर धरु लागला आहे. राम मंदिराच्या मुद्दयावरुन योग गुरु बाबा रामदेव यांनी एक विवादास्पद विधान केलं आहे. प्रभू रामचंद्र हे फक्त हिंदूंचेच नाही तर मुस्लिमांचे सुद्धा पूर्वज आहे, त्यामूळे राम मंदिर अयोध्येत होणारच. असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे.

अहमदाबाद येथील खेडा जिल्ह्यातील एका योग शिबिरात बाबा रामदेव यांनी शुक्रवारी (८ फेब्रुवारी) पत्रकारांशी संवाद साधला. राम मंदिर हे अयोध्येत नाही तर मक्का मदिना किंवा हॅटिकनमध्ये होणार का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी योगगुरु रामदेव बाबा यांनी कुंभमेळ्यात सहभागी होऊन संत आणि साधूंना धूम्रपान सोडण्याचे आवाहन केले होते. “आपण राम आणि कृष्णाचे भक्त आहोत ज्यांनी त्यांच्या जीवनात कधीही धूम्रपान केले नाही, मग तुम्ही का करता ? आपण धूम्रपान सोडणार अशी शपथ घेतली पाहिजे”, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. राम मंदिराचा मुद्दा देशाच्या गौरवाशी जोडलेला आहे. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझी इच्छा आहे की अयोध्येत राम मंदिर उभारायला हवे”, असेही बाबा रामदेव यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची नियुक्ती होण्याची शक्यता ?

News Desk

माहुलमधील प्रकल्पग्रस्तांचे “जीवन बचाओ आंदोलन”

News Desk

मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे !

News Desk