HW Marathi
राजकारण

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

नवी दिल्ली | राम मंदिराची निर्मिती झाली तर दिल्ली ते काबूलपर्यंत हिंसाचार माजवू दंगली घडवू, असा इशाराच जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरने दिला आहे. “आम्ही मुस्लिम बांधवांसाठी मशीद पुन्हा उभारू. ती जागा मशिदीची आहे त्यामुळे त्या जागेवर राम मंदिर बांधले जाऊ नये. जर राम मंदिर त्या जागी बांधले गेले तर दिल्लीपासून काबूलपर्यंत हिंसाचार माजवू, दंगली घडवू”,अशी इशारावजा धमकीच मसूद अजहरने दिली आहे.

“बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावून त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे मंदिर बांधण्यात आले. आता या जागेवर रामाचे भव्य मंदिर बांधण्याची मागणी होते आहे. जे अशी मागणी करत आहेत त्यांच्या हाती तलवार आणि त्रिशूळ आहे. तर मुस्लिम बांधव घाबरलेले आहेत. आमच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे”, असे अझरने म्हटले आहे.

दरम्यान, ‘राम मंदिर उभारण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. राम मंदिरावरून मसूद अजहर आम्हाला धमकी देत असेल तर पुढच्या सर्जिकल स्ट्राइकवेळी त्याच्यासारख्या दहशतवाद्यांचाच खात्मा केला जाईल,’ असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

Related posts

भविष्यकाळात एससी, एसटीचे आरक्षण रद्द करणार का ?

News Desk

महिला व बालविकास मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा !

News Desk

सरकार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट रचत आहे का ?

News Desk