नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात राजकीय नेत्यांकडून विविध राज्यांची नावे बदलण्याचा सपाट लागलेला असताना काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनी चक्क भाजपचेच नवे नामकरण केले आहे. “भाजप म्हणजे ‘जीटीयू’ अर्थात ‘गिरे तो भी टांग उपर’ असे आहे, असा टोला नवज्योतसिंह सिद्धू यांनी लगावला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगढ, मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांनी हे वक्तव्य केले आहे.
Punjab Min Navjot Singh Sidhu on #AssemblyElections2018 results: Rahul bhai pehle se hi sabko saath leke chalte hain. Insaniyat ki moorat hain. Jo haath Bharat ki takdir ko apne haathon mein lene waale hain, wo bade majboot hain, aur BJP ka naya naam- GTU, "Gire to bhi Tang Upar" pic.twitter.com/R8Qfrwq5hd
— ANI (@ANI) December 11, 2018
“जो हात देशाचे नशीब घडविणार आहे, तो अतिशय मजबूत आहे,” असे म्हणत नवज्योत सिंह सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे.”राहुल हे सुरुवातीपासूनच सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. ते माणुसकीची मूर्ती आहेत”, असेही यावेळी सिद्धू यांनी म्हटले आहे. यावेळीच नवज्योत सिंह सिद्धू यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, भाजपशासित तीन राज्यांमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. यामुळेच, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.