May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

संघाने देखील मोदींची साथ सोडली, त्यांचे जहाज आता डुबत आहे !

नवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जहाज आता डुबत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मोदींची साथ सोडली आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेली वचने, आश्वासने पूर्ण न केल्याने जनतेचा त्यांच्यावरील रोष पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील या निवडणुकांमध्ये त्यांच्यासाठी कोणतीही मेहनत घेताना दिसत नाही. ज्यामुळे पंतप्रधान मोदी मोठ्या चिंतेत दिसत आहेत”, असे विधान बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केले आहे. मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

“राजस्थानमधील अल्वर येथील सामूहिक बलात्कारप्रकरणी मायावतींचे अश्रू मगरीचे आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून दाखवावा”, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले होते. यावर “मोदी अत्यंत घाणेरडे राजकारण करत असून देशात आतापर्यंत झालेल्या दलितांवरील अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी मायावती यांनी केली होती.

“पंतप्रधान देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. अनेक नेते नोकर झाले आहेत. काही तर नोकर, चायवाला आणि चौकीदारही झाले आहेत. मात्र आम्हाला ख-या पंतप्रधानांची गरज आहे. आता त्यांनी जनतेला मूर्ख बनविण्याचे थांबविले पाहिजे”, असेही मायावती यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे निवडणुकांदरम्यान नेत्याचे मंदिरात जाणे थांबविण्यात यावे कारण हा देखील निवडणूक आचारसंहितेचा भंगच आहे”, अशीही मागणी मायावती यांनी केली आहे.

Related posts

एकनाथ खडसे यांची नार्को टेस्ट करा | अंजली दमानिया

अपर्णा गोतपागर

‘मढ्यावरचे लोणी खाणे’ म्हणजे काय हे गोव्यातील आजचे राजकारण पाहता समजून येईल | ठाकरे

News Desk

शपथ घेताच कमलनाथ यांनी केले शेतकऱ्यांचे कर्ज माफ

News Desk