HW News Marathi
राजकारण

मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखतं ?

बीड | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सावरगावात दसरा मेळावा घेतला. या आधी भगवान गडावर दसरा मेळावा घेतला यायचा परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू नंतर प्रथमच सावरगावात हा मेळावा घेण्यात आला. दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर सावरगावात भगवानबाबा यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी या स्मारकाचे अनावरण पंकजा मुंडे यांनी केले. मुंडेंनी यावेळी अनेक विषयांना हात घातला. यापुढे दसऱ्या मेळाव्याला इथेच यायचे, तसेच जर तुमच्या घरात मुलगी झाली तर तिला भगवानबाबा यांच्या भक्तीचा धागा बांधायचा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना केले.

गोपीनाथ मुंडें किंग मेकर होते आणि आता मी, किंग मेकर आहे असे ही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. विकासाचे सीमोल्लंघन करायचे आहे. वाघाच्या पोटी वाघिणीचा जन्म झाला आहे. अशी गर्जना सावरगावातून पकंजा मुंडे यांनी केली. उद्या शिर्डी,पुणे या ठिकाणी घरकुल योजने अंतर्गत अडीच लाख घरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समर्पित होणार आहे. आता मला विकासाची ओटी भरायची आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या. सरकार पाठ फिरवणार नाही,असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले आहे.आता आपल्याला विकासाचे सीमोल्लंघन करायचे आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की आम्ही अटल वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व पाहून मोठे झाले आहोत. मी काम करते तर तुमच्या पोटात का दुखत? फक्त सर्व्हे करून निवडणुका जिंकता येत नसतात, असा टोला ही पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित !

News Desk

भूपेश बघेल यांनी घेतली छत्तीसगढच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk

आता विधानसभा लढवा…अन् त्यानंतरच राजकारणातून संन्यास घ्या !

News Desk