HW News Marathi
राजकारण

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी भाजप- ठाकरे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by-election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीचे उमदेवार मुरजी पटेल (Murji Patel) या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या दोन्ही गटाने अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले. ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकासआघाडीकडून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते उपस्थित होते. तर भाजपच्या मुरजी पटेल यांच्या अर्ज भरण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रवीण दरेकर, नितेश राणे हे नेते सहभागी झाले.

दरम्यान, ठाकरे गटाकरून ऋतुजा लटके यांच्याबरोबर संदीप नाईक यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आली आहे. तर भाजपच्या मुरजी पटेल यांनी देखील दोन अर्ज दाखल केला आहे. ऋतुजा लटके राजीनाम्यावर राज्याचे राजकारण गेल्या दोन दिवसांपासून चांगलेच तापले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने संदीप नाईक यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खरी शिवसेना आमच्या बाजूने असल्याने आम्ही बहुमताने विजयी होऊ, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री दिपक केसरकर यांनी मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना माध्यमांशी बोलताना म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन्ही गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी निवडणूक कार्यालयाच्या आजूबाजूचा 10 मीटर अंतरावर असलेला परिसरात पोलिसांनी बॅरिकेटिंग करून संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता.

 

 

Related posts

भाजपच्या ‘या’ नेत्याने चक्क केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

News Desk

भाजपकडून ‘देशभक्ती’ हा निवडणुकीचा मुद्दा बनविला जात आहे !

News Desk

सर्व क्षेत्रांच्या समृद्धीसाठी विकासाच्या रोडमॅपद्वारे कामे सुरू! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna