जयपूर | राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जाते होते. मात्र आता अशोक गेहलोत यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी तर सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Rajasthan Chief Minister designate Ashok Gehlot and Deputy Chief Minister designate Sachin Pilot at AICC headquarters in Delhi pic.twitter.com/lwCnOcUayj
— ANI (@ANI) December 14, 2018
दरम्यान, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर या राज्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव निश्चित करावे यावरून पेच निर्माण झाला होता.राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा राज्यात सुटण्याची शक्यता दिसत नसल्याने बुधवारी (१२ डिसेंबर) झालेल्या राज्य काँग्रेसच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काँग्रेस हायकमांडकडून घेतला जाईल, असा प्रस्ताव मंजूर करण्यात होता.
सचिन पायलट आणि अशोक गेहलोत हे दोघेही आपापल्या मतदारसंघातून चांगल्या मताधिक्क्यांनी निवडून आले असल्याने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर या दोघांनीही दावा केला होता. “सचिन पायलट यांनी राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी प्रचंड कष्ट केले आहेत. त्यामुळे जर सचिन पायलट यांना राजस्थानचे मुख्यमंत्री केले नाही तर आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार”, असा इशारा राजस्थानातील आमदार पी. आर. राणा यांनी दिला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.