HW News Marathi
राजकारण

सचिन तेंडुलकरांच्या सुरक्षेत घट, तर आदित्य ठाकरेंना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा

मुंबई | राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकासआघाडीच्या सरकारने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत कपात केली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या ‘एक्स’ सुरक्षा व्यवस्थेत कपात करून आता त्यांना ‘एक्सॉट’ सुरक्षा देण्यात येणार आहे. तर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या ‘वाय प्लस ‘ सुरक्षेत वाढ करून आता त्यांना ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. सरकारकडून व्हीआयपी सुरक्षा पुरविण्यात येणाऱ्या राज्यातील एकूण ९७ जणांपैकी २९ जणांच्या सुरक्षा व्यवस्थेत आता बदल करण्यात आले आहेत. यात काहींच्या सुरक्षेत घट तर काहींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कालच (२४ डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. सचिन तेंडुलकर यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील केलेल्या या बदलानंतर आता ही भेट आता याच कारणासाठी होती का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या सुरक्षाव्यवस्थेच्या श्रेणीत कपात केली जाऊ नये, अशी मागणी यावेळी सचिन तेंडुलकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत झालेल्या वाढीमुळे देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, यासंबंधी आता मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वाढदिवसा निमित्त उद्धव ठाकरेंवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

News Desk

निवडणुकांसाठी मोदींचे हे खालच्या पातळीचे राजकारण | निरुपम

Gauri Tilekar

सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk