HW News Marathi
राजकारण

नातवाचा आजोबांकडे हट्ट, ‘साहेब’ निर्णयाचा पुर्नविचार करा !

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली आहे. यानंतर पवार यांचा नातून रोहित पवार यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यातून रोहित यांनी माढामधून निवडणूक लढविणार नसल्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा असे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणूक लढवावी. यासाठी पवारांनी न निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.

या पोस्टमध्ये राहितने म्हटले की, “साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदराच्या पुढे प्रेम असते आणि माझे आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाचे हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा.” असा आग्रह केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर आता नातवाच्या आग्रहाचा शरद पवार कसा विचार करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही विराेधी पक्षात नव्हे तर सत्तेत असू !

News Desk

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

News Desk

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

Aprna