HW News Marathi
राजकारण

सॅम पित्रोदा यांना गांधी परिवाराची सर्व गुपिते माहित आहेत !

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी १९८४ सालासंदर्भात केलेल्या विधानाप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी पित्रोदा यांना लक्ष्य केले आहे. “सॅम पित्रोदा यांना गांधी परिवाराची सर्व गुपिते माहित आहेत. पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरु आहेत. काँग्रेसच्या लेखी लोकांच्या जीवाला काही मूल्य नाही”, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

“१९८४ साली झालेल्या दंगलीबाबत बोलताना काँग्रेस म्हणते कि, जे झाले ते झाले. या दंगलीत काँग्रेसच्या नेत्यांवर दंगलीत सामील असल्याचा आणि दंगलीचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, आज ते म्हणतात कि जे झाले ते झाले. सॅम पित्रोदा हे राहुल गांधींचे गुरु आहेत. दिल्लीत २८०० शीख बांधवांची हत्या झाली. याबाबत त्यांनी उच्चरलेले ३ शब्द हे काँग्रेसचे चरित्र आहे, काँग्रेसची मानसिकता आहे, काँग्रेसचे इरादे आहेत. ‘झाले ते झाले’ हे ते ३ शब्द आहेत”, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी पित्रोदा यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते सॅम पित्रोदा ?

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतील रामलीला मैदानात आपल्या प्रचारसभेत शीख दंगलीवरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. “काँग्रेसला आपल्या पूर्वजांच्या नावावर मते हवी आहेत. परंतु, त्यांची कारस्थाने समोर आणली कि त्यांना त्रास होतो. १९८४ च्या शीख दंगलीचा हिशेब कोण देणार ?”, असा सवाल पंतप्रधान मोदींनी केला होता.

सॅम पित्रोदा या पार्श्वभूमीवर म्हणाले होते कि, “आता १९८४ चा काय संबंध ? तुम्ही (मोदी) ५ वर्षात काय केले, त्यावर बोला. १९८४ मध्ये जे झाले ते झाले. तुम्ही काय केले ? रोजगार निर्मितीसाठी, २०० स्मार्ट सिटीजसाठी तुम्हाला मत देण्यात आले होते. तुम्ही ते देखील नाही केले.” त्यावर शुक्रवारी सॅम पित्रोदा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शीख बंधू-भगिनींचे दुःख मी समजू शकतो. भाजपकडून माझ्या तीन शब्दांची मोडतोड करून चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे”, असे सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी सिद्धूंना क्लीन चिट 

News Desk

…म्हणून सुनावणी संपताच साध्वी प्रज्ञा यांनी भर न्यायालयात केला थयथयाट

News Desk

अयोध्येत आता मांस आणि दारूबंदी ?

swarit