HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

संबित पात्रांच्या व्हिडीओमुळे मोदी सरकारची उज्ज्वला योजना गोत्यात

नवी दिल्ली | भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांच्या एका व्हिडीओमुळे मोदी सरकार आणि मोदी सरकारची उज्ज्वला योजना गोत्यात आली आहे. संबित पात्रा यांनी ओडिसातील पुरीमधील एक व्हिडीओ ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत संबित पात्रा एका गरीब कुटुंबाच्या घरी जेवत आहेत. मात्र या घरातील महिला चुलीवर जेवण बनवत आहे, हे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील महिलांना होणाऱ्या चुलीच्या त्रासापासून मुक्तता देण्यासाठी उज्ज्वला योजना आणल्याचे मोदी सरकारकडून सांगितले होते. असे असताना इथे भाजपच्याच नेत्यांकडून या योजनेच्या मूळ हेतूला बगल दिली जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

संबित पात्रा यांचा या व्हिडीओनंतर काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “ज्या धर्मेंद्र प्रधान यांना उज्ज्वला योजनेचे श्रेय दिले जाते ते ओडिशाचे नाहीत का ?”, असे म्हणत काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजपच्या प्रत्येक बड्या नेत्याच्या भाषणात उज्ज्वला योजनेचा उल्लेख निश्चित असतो. भाजपने वारंवार आपल्या प्रचारासाठी उज्ज्वला योजनेचा वापर केला. ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत लाभदायक ठरल्याचे मोदी सरकारकडून वारंवार सांगितले जाते. मात्र, संबित पात्रा यांच्या या व्हिडिओनंतर या योजनेच्या यशस्वी होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जर ही योजना खरंच यशस्वी ठरली असेल तर अजूनही हे चित्र कसे पाहायला मिळते ?, हा सवाल उपस्थित होत आहे.

Related posts

#LokSabhaElections2019 : आम्ही लोकांसाठी एकत्र आलो, आम्हाला गोरगरीबांसाठी सत्ता हवी !

News Desk

देशाचे विभाजन करणाऱ्यांना येथेच गाडू!

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk