HW News Marathi
राजकारण

“मुख्यमंत्र्यांसोबत जाऊन बच्चू कडू यांनी स्वाभिमान गहाण ठेवला”, सुषमा अंधारेंची टीका

मुंबई | “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन बच्चू भाऊंनी स्वाभिमान गहाण ठेवला”, अशी खोचक टीका शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यावर केली आहे.  सुषमा अंधारेंनी बुधवारी (26 ऑक्टोबर) उपोषणाला बसलेल्या आमदार कैलास पाटील यांची भेट घेतली. यावेळी सुषमा अंधारेंना पत्रकारांनी बच्चू कडू यांना शिंदे सरकारने मंत्री पदा द्याला हवे होते, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे, असे म्हणत त्यांना टोला लगावला

सुषमा अंधारे म्हणाल्या, “बच्चू कडू यांच्या संपर्कात किती आमदार आहेत. मग ते सात असतील 17 असतील ते त्यांना माहिती. यांचे कसे माहिती आहे का?, प्रेम भंगाचे दु:ख कसे असते माहिती आहे का?, मैने तुम्हे दिल दिया दिलदार समझकर, तुमने ठुकरा दिया फुटबॉल समझकर, बच्चू कडूसाहेबांनी त्यांच्यासाठी जे काही केले होते. त्यांची शिंदे सरकारने काहीच किंमत ठेवली नाही. असे नाही कारयला पाहिजे, त्यांनी वाईट केले. बच्चू भाऊ तसा स्वाभिमानी माणूस आहे. प्रसंगी बच्चू भाऊने सुद्धा स्वाभिमानची तडजोड केली. हिंदुत्वासाठी स्वाभिमान गहाण ठेवला. तर शिंदे सरकारने बच्चू भाऊंना मंत्रिमंडळात घ्याला पाहिजे होते. मी खरे तर एकनाथ भाऊंचा निषेध करते की, त्यांनी बच्चू भाऊना मंत्रिमंडळात घेतले नाही.”

दरम्यान, “सत्तेचा कैफ जास्त झालेले लोक काही बोलू शकतात. तसेच हे लोक बोलत आहेत की, कल्प आणि दर्प आहेत. आदित्य ठाकरे हे त्यांना सळो की पळो करून टाकतील. आम्ही त्यांच्या टीकांना सकारात्मक घेतो. परंतु, ते ठाकरेंची दखल घेत असून त्यांच्या पायाखैलचा जमाम सरकाला”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जर मोदी जन्मतः ओबीसी असते तर संघाने त्यांना पंतप्रधान होऊ दिले असते का ?

News Desk

अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत गाजर हलवा झाला | उद्धव ठाकरे

News Desk

संपूर्ण देशाला वेदना होत असताना ‘प्राइम टाईम मिनिस्टर’ शूटिंगमध्ये व्यस्त होते !

News Desk