HW News Marathi
राजकारण

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच गोड बातमी !

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यात सुरु झालेला सत्तासंघर्ष काही थांबायचे नाव घेतानाच दिसत नाहीये. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या शिवसेना-भाजपमधील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसताना दुसरीकडे मात्र शिवसेना-राष्ट्रवादीच्या नव्या समीकरणांची देखील चर्चा सुरु आहे. दरम्यान, या संपूर्ण सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांच्या भेटी घेतल्या आहेत, या दरम्यान अनेक राजकीय चर्चा-अनेक भेटीगाठी सुरु आहेत. तसेच आज (६ नोव्हेंबर) दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. त्यानंतर, भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर, आता थोड्याच वेळापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी पुन्हा एकदा “भाजपने सरकार स्थापन करावे”, असे म्हटले आहे. तर “शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच गोड बातमी”, असे म्हणत मुनगंटीवारांना देखील प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

  • उद्धव ठाकरेंना भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही.
  • उद्धव ठाकरेंशी काहीच वेळापूर्वी चर्चा झाली.
  • उद्या उद्धव ठाकरे नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करणार.
  • राज्यपालांना सर्वपक्षीय नेते भेटले आहेत.
  • भाजपने सरकार स्थापन करावे.
  • भाजप सरकारला काँग्रेसचा विरोध आहे.
  • शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हीच गोड बातमी आहे.
  • सर्वात मोठ्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा करावा.
  • शिवसेनेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच बसवणार.
  • भाजप १४५ आमदारांची यादी जाहीर करत असेल तर आनंदच आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिक बंदी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे !

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील अहवाल मागासवर्ग आयोगाकडून मुख्य सचिवांकडे सुपूर्द

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विधिमंडळाचे कामकाज तहकूब

News Desk