नवी दिल्ली | छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा झटका बसला आहे. या विधानसभा निकालानंतर भाजपचा महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार बोचरी टीका केली आहे. या निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव म्हणजे जनतेचा राग असल्याचे टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.भाजपने जनतेचा राग समजून घ्यावा आणि आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला यावेळी राऊत यांनी भाजपला दिला आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: I won't say these are victories of Congress but this is an anger of the people. Self-reflection is needed #AssemblyElections2018 pic.twitter.com/YL1gNECx5a
— ANI (@ANI) December 11, 2018
पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल सायंकाळपर्यंत होतील. भाजपची सत्ता असलेल्या तिन्ही राज्यात काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्याने भाजपला धक्का बसला आहे. यापैकी छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपची धूळधाण उडवली आहे. तर मध्य प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. उत्तर भारतातील ही राज्ये भाजपसाठी अतिशय महत्त्वाची मानली जात होती. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये गेल्या दीड दशकापासून भाजप सत्तेत होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत या राज्यांमध्ये भाजपची सत्ता येणे अवघड असल्याची चिन्हे दिसत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.