HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

काँग्रेस पक्षाने कारवाई करत सत्यजीत तांबे यांना केले निलंबित; नाना पटोलेंची माहिती

मुंबई | नाशिक पदवीधर निवडणुकीची (Nashik Graduate Election) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. महाविकास आघाडीची आज (19 जानेवारी) घेतलेल्या बैठकीत शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचे ठरल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितली. पक्षासोबत बंडखोरी केलेल्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आल्याची माहिती नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांना दिली आहे. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद घेतली.

 

या मतदारसंघातून काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. यानंतर सत्यजीत तांबे याना पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

 

पटोले सत्यजीत तांबेसंदर्भात बोलताना नेमके काय म्हणाले

पत्रकारांनी पत्रकार परिषदेत सत्यजीत तांबेसंदर्भात बोलताना नाना पटोलेंनी बोलताना म्हणाले, “तांबे परिवारांचे काय झाले?, याबद्दल आम्हाला विचारू नका. कारणा आम्ही सत्यजीत तांबेंना पक्षातून निलंबित केले आहे. बाळासाहेब थोरात आमचे साहेब नेते आहेत. सध्या ते रुग्णालयात आहेत. आम्ही बाळासाहेब थोरात त्यांच्या संपर्कात आहोत. त्यांची काय भूमिका आहे, ते पाहू. परंतु, सध्या सत्यजीत तांबे यांना पक्षातून निलंबित केले आहे.”

 

Related posts

गुजरात, कर्नाटक, उत्तराखंडनंतर भाजप आणखी एक मुख्यमंत्री बदलणार!

News Desk

परळी आगाराच्या चालकाने केले विषप्राशन

News Desk

नारायण राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम

Aprna