HW Marathi
कोकण मंत्रिमंडळ महाराष्ट्र

वर्षा गायकवाड यांचा पूरग्रस्त भागात दौरा, कार्यकर्त्यांनी वाजवले फटाके

हिंगोली | गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. यावेळी नांदेड, हिंगोली, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यात ढगफुटी झाली होती. हिंगोलीमध्ये कयाधू नदीला पूर येऊन अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा आणि सेनगाव तालुक्याला पावासाचा फटका बसला होता. सध्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. कारण पेरलेले सर्व पुराने वाहून नेले आहे. त्यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यात सध्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या परभणीवरून हिंगोलीत आल्या. यावेळी त्यांनी वसमत तालुक्यातील एका शेतीची पाहणी केली. त्यापूर्वी मात्र कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यांचं स्वागत केलंय.

अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही, पण…

पालकमंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या पूरग्रस्त भागांचे दौरा केला. पण, पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यामुळे फटाके वाजवून पूरग्रस्त भागांचे अश्रू कसे पुसणार? असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. शेकडो हेक्टर जमीनीचे नुकसान झाले असताना फटाके फोडून स्वागत करण्याची गरज काय? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या वतीने विचारला जात आहे. तसेच त्यांच्यामध्ये प्रचंड रोष आहे.हिंगोलीतील पुरामुळे शेतीचे नुकसान तर झालेच आहे. अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. पण, आता अळी, लाल्या रोगाने पिकांवर हल्ला चढविला आहे. शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. मदतीची गरज आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने ते दिले नाही, ही दुर्दैवी बाब आहे. हे सरकार अपघाताने सत्तेत आलं आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या भावना समजत नाहीत.

काँग्रेसला कुठं कसं वागायचं कळत नाही. हसायच्या वेळी रडतात आणि रडायच्या वेळी हसतात. शेतकऱ्यांसोबत त्यांना काहीही देणंघेणं नाही, अशी टीका भाजपचे स्थानिक आमदार तानाजी मुटकुळे यांनी एबीपी माझाशी बोलताना केली. तसेच शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आलेले असताना फटाके फोडण्याची गरज काय? असा प्रश्न पालकमंत्र्यांनी विचारणार असल्याचेही ते म्हणाले.

Related posts

अनुसूचित जाती आरक्षण करीता महामेळावा

News Desk

हात जोडतो, दुखणी अंगावर काढू नका ! आरोग्यमंत्र्यांचे कळकळीचे आवाहन

News Desk

उस्मानाबादेत लाच स्वीकारताना महिला उपजिल्हाधिकारी अडकल्या पोलिसांच्या जाळ्यात!

News Desk