HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले उमेदवार !

जळगाव । “चंद्रकांत पाटील हे पुरात वाहून आलेले उमेदवार आहेत”, असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील शुक्रवारी (११ ऑक्टोबर) जळगाव येथे बोलत होते. “चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर काय करायची ती टीका करू देत. त्यांना कोणी गांभिर्याने घेत नाही”, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“राज्य सरकारला विरोधी पक्षाची भीती वाटत असून अमित शहा प्रत्येक सभेमध्ये शरद पवार यांना लक्ष करत आहेत. याचाच अर्थ राष्ट्रवादी अतिशय ताकदीने भाजप आणि शिवसेनेचा प्रतिकार करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षापेक्षा विरोधी पक्षाची ताकद विधानसभेमध्ये मोठी असेल”, असा दावाही यावेळी जयंत पाटील यांनी केला आहे.

खाजगीकरणाबाबत बोलताना पुढे जयंत पाटील म्हणाले की, “केंद्र सरकारची आर्थिक अवस्था बिकट असून सरकार प्रायव्हेटायझेशन करत आहे. जिओसाठी म्हणून गेल्या २ वर्षांपासून एमटीएनएल बीएसएनएलचे खच्चीकरण सुरू असल्याचे जयंत पाटील म्हणाले. रेल्वेचा आर्थिक बजेट बंद करण्याचा अति शहाणपणा केंद्र सरकारने केला. त्यामुळे रेल्वेचे नेमकं काय चाललंय ? हे नागरिकांना कळत नाही”. सरकार रेल्वेला खासगीकरणाकडे नेत असल्याचा आरोपही यावेळी जयंत पाटील यांनी केला.

Related posts

विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर

News Desk

राष्ट्रवादी करणार १८ नगरसेवकांवर कारवाई

News Desk

काँग्रेसच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे निर्णय

News Desk