HW Marathi
राजकारण विधानसभा २०१९

युतीच्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या कि तिथली गर्दी कशी ओसरते बघा !

कोल्हापूर | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस भाजप-शिवसेनेची ताकद वाढत आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मात्र यंदा आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल अशी परिस्थिती आहे. मात्र, येत्या काळात ही परिस्थिती बदलेल असा विश्वास कोल्हापूरमधील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. “शिवसेना-भाजपच्या उमेदवाऱ्या जाहीर होऊ देत. मग तेथील गर्दी कशी ओसरते ते बघाच”, असे विधान सतेज पाटील यांनी केले आहे.

पक्षातील अनुभवी, जेष्ठ नेत्यांच्या आऊटगोइंगमुळे सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, जनता या नव्या चेहऱ्यांना स्वीकारणार का ? या नव्या चेहऱ्यांसोबत या पक्षांचा विधानसभेत शिवसेना-भाजपसमोर टिकाव लागणार का ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सतेज पाटील यांनी मात्र युतीतील नेत्यांची गर्दी ओसरणार असल्याचा दावा केला आहे. “अनेक नेते सध्या कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. लवकरच नवीन अध्याय सुरु होईल”, असे सूचक विधान सतेज पाटील यांनी केले आहे.

Related posts

ज्यांनी कधीही निवडणूक लढवलेली नाही त्यांनी ईव्हीएमवर बोलूच नये !

News Desk

भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन !

News Desk

बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी माढ्याला वळवा !

News Desk