HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

दुष्काळी दौऱ्यात सत्कार स्वीकारणार नाही !

बारामती | बारामती तालुका हा पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बुधवारी (५ मे) एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु केला. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या दुष्काळी गावांना भेटी दिल्या. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यादरम्यान होणाऱ्या त्यांच्या सत्काराला नकार दिला आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांनी खैरेपडळ गावापासून दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी दुष्काळी गावातील चारा छावण्यांना भेटी दिल्या. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीतील वढणे गावच्या चारा छावणी वर जात शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, ७ जून रोजी शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याशी राज्यातील दुष्काळावरील उपाययोजनांबाबत चर्चा करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.

Related posts

शिवसेना प्रवेशासंदर्भात पवारांनी घेतली भुजबळांची भेट

News Desk

‘त्या’ वक्तव्यासाठी साध्वी प्रज्ञा यांना कधीही मनापासून माफ करू शकणार नाही !

News Desk

घाम गाळून पिकवलेला कांदा ‘आत्मघातकी’ ठरत आहे !

News Desk