HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

पवारांनी मुंडेंचे घर फोडले, जयदत्त क्षीरसागर यांचा गंभीर आरोप

मुंबई | “पवारांनी मुंडेंचे घर फोडले”, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या बीड दौऱ्यादरम्यान टीका केली होती. शरद पवार यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना जयदत्त क्षीरसागर यांनी पवारांवर हे गंभीर आरोप केले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे आरोप बिनबुडाचे असल्याची जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.

“पवारांनी दुसऱ्यांच्या कुटुंबात वितुष्ट निर्माण करून त्यांची घरे फोडली. शरद पवारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडून आपल्या पुतण्याला बक्षीस दिले. राज्यात असे अनेकांसोबत घडले आहे. त्यामुळे आता पवारांनी दुसऱ्याला उपदेश देण्यापेक्षा स्वत: आत्मपरीक्षण करावे”, असा सल्ला जयदत्त क्षीरसागर यांनी दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी जयदत्त क्षीरसागर यांना प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर टीका देखील केली आहे. “जयदत्त क्षीरसागर यांचे हे आरोप बिनबुडाचे आहेत. शरद पवार यांनी मुंडेंचे घर फोडले नाही. जयदत्त क्षीरसागर यांनी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

विधानसभेकरिता १८ सप्टेंबर रोजी बीडमध्ये राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा मेळाव्यादरम्यान बीडमधील ५ उमेदवारांची घोषणा केली. या यादीत परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व तर केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती.

Related posts

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला १ रुपयांचे पहिले दान

rasika shinde

शिवसेना पंतप्रधान मोदींना घाबरते !

News Desk

जे.जे.रुग्णालयातील ‘कोरोना’च्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण !

अपर्णा गोतपागर