HW News Marathi
राजकारण

सवर्ण आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकण्यावर शंका | शरद पवार

कोल्हापूर | आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना मोदी सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल की नाही, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेले पवरा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरक्षण विधयकावर सवाल उपस्थित केले. हा निर्णय नेमका कोणासाठी घेण्यात आला आहे?, असा प्रश्न विचारत हे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे मत अनेक घटनातज्ज्ञांनी व्यक्त केल्याचे देखील पवार सांगितले. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे. ५ राज्यांचा निवडणूक निकाल पाहाता, लोकांना बदल हवा असल्याचेही दिसून आल्याचे पवार म्हणाले, असे बोलून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

आरक्षणाने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. ५० टक्क्यांपुढील आरक्षण टिकणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा स्पष्ट केले आहे. या आरक्षणासाठी घटना दुरुस्ती केल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या आरक्षणाच्या ढाच्यात बदल करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेने बहुमताने घेतला. मात्र तो न्यायालयात टिकू शकणार नाही. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त यांचे आरक्षण टिकेल. त्याला कोणताही धक्का लागणार नाही. पण सवर्ण आरक्षण टिकेल असे मला वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.

लोकसभा जागा वाटपचा अंतिम टप्प्यात

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाबाबच चर्चा सुरु असल्याची माहिती पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाली त्यावेळी जागावाटपासंदर्भात चर्चा झाली आहे. लोकसभेच्या ४० जागांचा वाटप संपला असून ८ जागांचा विषय बाकी आहे. प्रत्यक्ष तीन ठिकाणी अडचणी येत आहेत. येत्या आठवड्याभरात ८ दिवसात जागावाटपाचा प्रश्न सुटेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून याठिकाणी प्रभावी उमेदवार दिला जाईल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

 

Related posts

प्रियांका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात लढणार ?

News Desk

काश्मीरमध्ये कधी येऊ सांगा, राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना सवाल

News Desk

नितीश कुमार यांचा लालूप्रसाद यांना फोन, राजकीय चर्चांना उधान

News Desk