May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शरद पवार हे फिल्डवरचे नेते !

पुणे | “शरद पवार हे फिल्डवरचे नेते आहेत. म्हणून ते फिल्डवर असतात. कोणी कसे काम करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे सध्या मंत्रालयातून राज्यातील सरपंच, अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावला आहे. “मुंबईत बसण्यापेक्षा माझ्यासारखे दुष्काळी दौरे करा. तरच राज्यातील दुष्काळाची खरी परिस्थिती समजून घेता येईल”, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

“राज्यात दुष्काळामुळे अत्यंत भीषण स्थिती झाली आहे. धरणं तळाला गेली आहेत, जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरीही दुष्काळाचा सामना करण्यास ते मागे पडत आहेत. मुंबईत बसून राहण्यापेक्षा माझ्यासारखे दुष्काळी दौरे करा. तरच राज्यातील दुष्काळाची खरी परिस्थिती समजून घेता येईल”, असा टोला शरद पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला होता.

Related posts

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने केली दिलगिरी व्यक्त

News Desk

मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केलं

धनंजय दळवी

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk