HW Marathi
राजकारण

आज शरद पवार घेणार सातारा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (९ मार्च) सातारा मतदार संघातून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबतचा निर्णय घेणार आहेत. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी आज मुंबईत शरद पवार यांची सातारा लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे हे मुंबईत दाखल झाले आहेत.

शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद क्षमवून त्यांच्या मनोमिलनाचा प्रयत्न केला होता. मात्र “आमच्यात मनोमिलन होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही”, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी माथाडी कामगार नेते आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

भाजप काँग्रेसला घाबरल्यामुळे मला नजरकैद | संजय निरुपम

News Desk

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना गडकरींचा घरचा आहेर

News Desk