HW News Marathi
राजकारण

शरद पवारांचे ‘ते’ ट्विट, संजय राऊतांकडून ‘रिट्विट’

मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असल्याचा टीका देखील राष्ट्रवादीकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर, “आपले राजकीय मतभेद असतील पण सूडाने वागणारे आम्ही नाही. आम्ही कोणाहीसोबत सुडाने वागत नाही. मी आणि मुख्यमंत्री तुम्हाला शब्द देतो कि आम्ही तुमच्याशी सुडाने वागणार नाही”, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिला आहे.

एकीकडे उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांना हा विश्वास दिलेला असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांचे ट्विट रिट्विट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही”, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. हे ट्विट आता चक्क संजय राऊत यांनी रिट्विट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतला मराठी माणूस ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये विसावला !

News Desk

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna

मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्रे गायब

News Desk