HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : माढातून शरद पवार की विजयसिंह मोहिते पाटील ?

मुंबई | लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. यानंतर सर्व राजकीय पक्ष उमेदवारांच्या जागा वाटपांना देखील वेग आला आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून माढ्याच्या मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लढणार असल्याचे आधी सांगण्यात आले होते, तशा चर्चाही सुरु होत्या. परंतू माढ्यातून शरद पवार लढणार नसून विजयसिंह मोहिते पाटील लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

माढ्यातील जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये आज (११ मार्च) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर कळेल की, माढाच्या जागेवर नक्की कोण निवडणूक लढविणार आहे. परंतु  विजयसिंह मोहिते पाटलांना डावलल्याने पक्षात नाराजीचा सुर आवळला जावू लागल्याने त्या पार्श्वभूमीवर या जागेचा पुनर्विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…धुळे मतदारसंघाबाबत

News Desk

मुख्यमंत्री पदी विराजमान होताच कमलनाथ यांच्या अडचणीत वाढ

News Desk

महाआघाडीचा निर्णय १० डिसेंबरला ?

News Desk