नवी दिल्ली | उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळासह कुंभमेळ्यात शाही स्नान केले होते. या शाही स्नानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने नेते शशी थरूर यांनी वादग्रस्त ट्विट केले होते. यानंतर थरूर यांच्या ट्वीटवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर आणि राहुल गांधीवर हल्लाबोल केला आहे.
Smriti Irani:For Shashi Tharoor to make a statement which tantamounts to a religious slur.Question needs to be asked of Rahul Gandhi who strategically wears a ‘Jenau’ only when there are polls, as to why he has allowed this attack on beliefs of millions of Hindus across the world pic.twitter.com/RIYkVynr47
— ANI (@ANI) January 30, 2019
“शशी थरूर यांचे हे विधान हिंदू धर्माचा जाणूनबुजून केलेला अपमानच आहे. तुम्ही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विचारा की, निवडणुका आल्यावर ते ‘जानवे’ का घालतात. तुम्ही आधी याचे उत्तर द्या. यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात,” अशा शब्दात स्मृती इराणीने टीकास्त्र सोडले.
नेमके काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी (२९ जानेवारी) मंत्रीमंडळासह कुंभमेळ्याला भेट देऊन शाही स्नान केले. या शाही स्नानाचा फोटो योगींनी त्यांच्या ट्विट केला. यानंतर योगींच्या शाही स्नानाच्या फोटोवरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी योगी आदित्यनाथ व केंद्र सरकारच्या गंगा शुद्धिकरणावर टीका करत ट्विट केले आहे.
ऐतिहासिक कुम्भ, प्रयागराज में आज पवित्र संगम तट पर पूज्यनीय संत महात्माओं और प्रदेश सरकार के मंत्री परिषद के सदस्यों के साथ स्नान कर पूजा एवं आरती की। pic.twitter.com/sTJVBmRTbZ
— Yogi Adityanath (@myogiadityanath) January 29, 2019
“गंगेला स्वच्छही करायचे आहे आणि त्यात पापही धुवायाचे आहे. या संगमावर सगळेच नागडे आहेत. जय गंगा मय्या की,” असे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनंतर थरूर यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. त्याचप्रमाणे राजकीय वर्तुळात देखील त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर मोठी चर्चा रंगली.
गंगा भी स्वच्छ रखनी है और पाप भी यहीं धोने हैं। इस संगम में सब नंगे हैं!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 29, 2019
जय गंगा मैया की! pic.twitter.com/qAmHThAJjD
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.