HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राहुल गांधींची भेट, लवकरच करणार काँग्रेस प्रवेश

नवी दिल्ली | अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यामुळे  त्यांना भाजपचे तिकीट कापण्यात आले आहे. यानंतर सिन्हा यांनी आज (२८ मार्च) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे बिहारमधील प्रमुख नेते शक्ती सिंग गोहील यांनी सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर सिन्हा हे काँग्रेसचे स्टार प्रचारक देखील असणार असल्याची माहिती दिली आहे.

शत्रुघ्न सिन्हा हे भाजप कडून पाटना साहीब मतदारसंघातून निवडणूक लढवायचे. परंतु यंदा या मतदारसंघातून पक्षाने केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांना तिकीट देऊन शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसचा वाटेवर गेले आहे. परंतु अद्याप बिहारमधील महागठबंधनचे जागा वाटप झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसने अद्याप पाटना साहिबमधून सिन्हा यांना तिकीट देणार की नाही हे जाहीर केलेले नाही.

Related posts

पोलादपूर बस दुर्घटनेवरुन भाजप सरकारवर उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा ५६% निधी प्रसिद्धीवर खर्च

News Desk

निकषांची वाट पाहण्यापेक्षा सरकारने दुष्काळ जाहीर करावा | अजित पवार

Gauri Tilekar