HW News Marathi
राजकारण

अमेठीपेक्षा इटलीतील लहान मुलांना शिव्‍या शिकवा !

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीचे आता शेवटचे दोन टप्पे शिल्लक आहेत. यात १२ मे रोजी सात राज्यात ५९ जागेसाठी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांती स्टार प्रचारकांनी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. योगींनी दिल्लीतील आज (७ मे) रॅलीदरम्यान शहजादा (राजकुमार) फेल झाला म्‍हणून काँग्रेसने शहजादीला (राजकुमारीला) राजकारणात आणले. या संपूर्ण रॅलीत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी व काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी -वधेरा यांच्‍यावर तिखट बोचऱ्या शब्दात टीका आहे.

या प्रचार रॅलीवेळी योगी आदित्यनाथ म्‍हणाले की, “शहजादा (राजकुमार) फेल झाला म्‍हणून काँग्रेसने शहजादीला (राजकुमारीला) राजकारणात आणले. अमेठीतील लहान मुलांना शिव्‍या शिकवण्‍यापेक्षा कृपा करुन इटलीतील लहान मुलांना शिव्‍या शिकवा,” असा सल्‍ला प्रियांका गांधी यांना यावेळी योगी आदित्यनाथ यांनी दिला. बॉलिवूड अभिनेत्री स्‍वरा भास्‍कर यांनी दिल्लीत आपचा प्रचार केला असून त्यांच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे भाजपचे स्‍टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्‍लीमधील मंडावलीत आज प्रचार रॅली केली.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांनी भाजपवर केलेल्या ‘त्या’ आरोपाचे गिरीश महाजनांनी केले खंडन

Aprna

मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?

News Desk

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

Aprna