HW News Marathi
राजकारण

शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकांवर आज एकत्र सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या आमदारांच्या अपात्र आणि  याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज (20 जुलै) सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेची  गटनेते पदावरून हकालपट्टी करत अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड केली. तर विधीमंडळाच्या मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू यांची नियुक्ती केली. त्यावेळी शिंदे गटाने सुनील प्रभू यांची निवड रद्द करत त्या जागी भरत गोगावले यांची निवड केली. आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे वरिष्ठ नेते सुभाष देसाई, विधीमंडळ मुख्य प्रतोद पद, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि बंडखोर आमदारांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी दिलेल्या आमंत्रणाविरोधात  प्रस्तावासंदर्भातील शिवसेने न्यायालयात याचिका आव्हान दिले असून या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

शिंदेंसह 16 आमदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर झिरवळ यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार 16 आमदारांची आमदारकी रद्द करण्याची नोटीस पाठविली होती. यानंतर शिंदे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर 27 जून रोजी  न्यायमूर्ती सुर्यकांत व जे. बी. पारडीवाला यांनी बंडखोर आमदारांना झिरवळ यांनी पाठविलेल्या नोटीसीवर 12 जुलैपर्यंत लेखी उत्तर देण्यासाठी मुदतवाढ दिली होती. दरम्यान, या प्रकरणी 11 जुलै रोजी घटनापीठाची स्थापना करणे गजेचे असून जोपर्यंत न्यायालयाच्या निर्णय येत नाही. तोपर्यंत आमदारांवर कारवाई करू नये, अशा सूचना सर न्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्या होत्या.

संबंधित बातम्या

सर्वोच्च न्यायालयात 20 जुलैला एकनाथ शिंदे सरकारचे भविष्य ठरणार

मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर सुनावणी सुरू

शिंदे गटाला मोठा दिलासा! अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार तुर्तास टळली

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील सत्तासंघर्षाचे पडसाद सोशल मीडियावर

News Desk

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात !

News Desk

भाजपला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही भाजप दबली जाणार नाही !

News Desk