HW News Marathi
राजकारण

राजकारणातील पवारांविषयीची भीती संपली !

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक दिग्गज नेते भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी पक्षाला लागलेल्या गळतीवर बोलताना ते म्हणाले की, आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र, आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी असा सल्ला त्यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. यावरून सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

आजच्या अग्रलेखातील काही महत्वाचे मुद्दे…

शिवसेनेने संकटकाळी जी भाषा वापरली, तीच भाषा वापरुन पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा देण्याचे काम पवार करीत आहेत. पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे, पण राजकारणातील त्यांच्याविषयीची भीती संपली आहे. तसेच, जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून उडवणारे कोण होते ? पवारसाहेब तुम्हीच होता. शेवटी कावळेच ते, कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा उडाले ते कावळे राहिले ते मावळे या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण, शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले,

शिवसेनेने संकटकाळी जी भाषा वापरली, तीच भाषा वापरुन पोखरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ऊर्जा देण्याचं काम पवार करीत आहेत. पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे, पण राजकारणातील त्यांच्याविषयीची भीती संपली आहे, असे म्हणत शिवसेनेच्या सामनातील अग्रलेखातून पवारांचं राजकीय खच्चीकरण करण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला आहे. तसेच, जे कावळे उडाले त्या कावळ्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून उडवणारे कोण होते ? पवारसाहेब तुम्हीच होता. शेवटी कावळेच ते, कावळेच राहिले. असे अनेक कावळे शिवसेनेतून उडून गेले. तेव्हा उडाले ते कावळे राहिले ते मावळे या मंत्रावर शिवसेना उभी राहिली. कारण, शिवसेनेत बाळासाहेबांनी घडवलेले मावळे हे जमिनीवरच राहिले.

जे कावळे उडाले त्या कावळय़ांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळय़ांचे मावळे होऊ शकले नाहीत. तसेच कधी कधी राजकारणात मजबुरी म्हणूनही ‘पदरी पडले पवित्र झाले’ या धोरणाने वागावे लागते. मग ते कावळे काय आणि राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात, असे म्हणत शिवसेनेने पवारांवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्याच्या श्रीनिवास पाटलांनी घेतली खासदारकीची शपथ

News Desk

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही; छगन भुजबळ यांच्यासह ‘मविआ’चा सभात्याग

Aprna