HW News Marathi
राजकारण

संजय राऊत प्रकरणात ED ने दोन ठिकाणी टाकले छापे

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडीची (ED) कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकले आहे. या दोन्ही ठिकाणी ईडीची झाडाझडती सुरू आहे. राऊतांच्या वकीलाने आज (2 ऑगस्ट) 8.30 ते 9.30  वाजता ईडीच्या कोठडीत भेट घेतली. या प्रकरणाशी संबंधित काही लोकांना ईडीने समन्स पाठवल्याची माहिती मिळाली आहे.

 

ईडीने 16 तासांच्या चौकशीनंतर रविवारी 31 जुलै रोजी रात्री उशिरा राऊतांना अटक करण्यात आली होती. राऊत ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नसल्याच्या आरोप करत ईडीने त्यांना अटक केला होता. यानंतर राऊतांना काल  (1 ऑगस्ट)  जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीएमएलए न्यायालयात हजर होते. न्यायालयाने राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली.

 

न्यायालयाने राऊतांना ईडी कोठडीदरम्यान सकाळी 8.30 ते 9.30 वाजेपर्यंत वकिलांना भेटण्याची मुभा दिली आहे.  संजय राऊत हे हर्ट पेशंट असल्यामुळे त्यांना घरचे जेवण आणि औषधांची मुभा दिली आहे. रात्री 10.30 वाजल्यानंतर राऊतांची कोणतीही चौकशी करता येणार नाही, असे निर्देश न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ED कोठडी

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पर्यटकांची पसंती

News Desk

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

HW Exclusive : एकनाथ शिंदेंसारखा अडाणी मुख्यमंत्री यापूर्वी महाराष्ट्राला कधी लाभला नाही! – विनायक राऊत

Aprna