HW News Marathi
राजकारण

शिवसेना २०१९ ची निवडणूक ‘स्वबळावर लढणार’

मुंबई – शिवसेना २०१९ ची निवडणूक ’स्वबळावर लढणार’ असल्याचा निर्णय सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेते पदी निवड करण्यात आली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचा ठरावाला सेनेच्या सर्व मंत्र्याकडून मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेना लोकसभेत २५ जागा आणि विधानसभेत १५० जागा स्वबळावर लढवणार आहेत. कार्यकारणी सभेत घेतलेल्या निर्णयावर शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.

या बैठकीत पक्षप्रमुख पदावर पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आल्याची घोषणा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेते पद कायम ठेवण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘औरंगाबाद’ जिल्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्यामागे कारण काय?

Manasi Devkar

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

ज्यांच्या रक्तात भारत आहे ते एअर स्ट्राइकवर संशय घेतील का ?

News Desk