मुंबई | “शिवसेना राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार आहे,” अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी काल ( 11 जुलै) काल खासदारांसोबत घेतलेल्या बैठकीत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी आज (12 जुलै) पत्रकार परिषदेतून सांगितले. खासदारांसोबत झालेल्या बैठकीत माझ्यावर कोणीही दबाव आला नाही. आमश्या पाडवी, निर्मला गावित आणि शिवसैनिकांनी विनंती केल्यानंतर मुर्मूंना पाठिंबा दिल्याचे उद्धव ठाकरेंनी जाहीर केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “गेल्या 4-5 दिवस मला माझ्या शिवसेनेतल्या विशेषता आदिवासी आणि आदिवासी समाजात काम करणाऱ्या जनतेने आणि माझ्या शिवसैनिकांनी विनंती केलेली आहे. यात एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ठवळे आहेत. त्यांनी देखील विनंती केली, त्यांचे देखील माझ्याकडे पत्र आहे. काल आमच्याकडे आमश्या पडवी आले होते. त्यांना विधान परिषदेवर संधी दिलेली आहे. निर्मला ताई गावित आल्या होत्या. पालघरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्यासुद्धा आल्या होत्या, असे बरेच लोक एसटी आणि एनटी यासमाजातील लोकांनी सुद्धा विनंती केलेली आहे. प्रथमच आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक वेगळी ओळख मिळते आहे. आदिवासी सुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होई शकतात. आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हा सगळ्यांना आनंद होईल. या सगळ्या गोष्टीचा, विनंतीचा आणि प्रेमाचा जो काही मला आग्रह केला. त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे. हा पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो. कोणताही दबाव किंवा कोणतेही नाही तर आताचे जे राजकारण सुरू आहे. हे राजकारण पाहिले तर मी पाठिंबा देण्याऐवजी विरोध करायला पाहिजे. शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी खोट्या मनानी विचार केलेला नाही.”
खासदारांच्या बैठकीत कोणताही दबाव नाही
“आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता राष्ट्रपती पदाची निवडणूक तोंडावर आली आहे. मी मुद्दामून आज तुमच्यासोबत एवढ्यासाठी बोलयोय. काही बातम्या या फार विचित्र पद्धतीने आपल्यापर्यंत आणि आपल्या मार्फत जनतेसमोर गेल्या आहेत. पहिल्या प्रथम मी स्पष्ट गोष्ट आपल्यासमोर सांगतो. काल जी खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कोणीही कोणताही दबाव माझ्यावर आल्या नाहीत. सर्वांना सांगितले की हा विषय आहे. आपण त्या तो आदेश कोणाला पाठिंबा त्यांचा कोणाला नाही. हे तुम्ही सांगाल तसे, आजही मी भूमिका स्पष्ट करतोय आहे. आज सुद्धा तुम्ही पाहिले असेल. इकडे गर्दी सुरू आहे. मातोश्रीवर सुद्धा रिग लागलेली आहे. त्याही आजमी माझ्या नाईलाजाने पराभवूत झालेल्या माझ्या गेल्या निवडणुकीतील उमेदवार सुद्धा बोलविले होते. त्यांच्यासोबत देखील चर्चा झाली. जिल्हाप्रमुखांबरोबर चर्चा करतोय, खासदारांबरोबर करतोय. आता हे कार्यकर्ते आलेले आहेत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनेने नेहमीच राष्ट्रपदी पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
उद्धव ठाकरे म्हणाले “जेव्हा प्रतिभाताई यांचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी नाव आले. तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पक्षाच्या पलिकडे जावून देशाचा विचार केला. आणि प्रतिभाताई यांना पाठिंबा दिला. प्रणवदादांना सुद्धा एक योग्य व्यक्ती तिकडे विराजमान होते. त्यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. आणि त्याच परंपरेमध्ये मी या सामाजातील जे आमचे कार्यकर्ते आहेत. किंवा अनेक ज्या काही संघटना आहेत. त्यांनी जो काही प्रेमाचा आग्रह केला. त्या आग्रहाचा आदर करत शिवसेना राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी यांना पाठिंबा देतोय हे मी आज जाहीर करतोय.”
संबंधित बातम्या
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा हा मोठा निर्णय, आम्ही मुर्मूंचे स्वागत करतो! – मुख्यमंत्री
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.