HW News Marathi
राजकारण

दै. सामनाच्या पहिल्या पानावर मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात; भाजपच्या नेत्याचा टोला

मुंबई | शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळख असलेल्या सामनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची जाहीरात छापून आले आहे. सामनाच्या (saamana) पहिल्या पानावर पंतप्रधानांच्या हस्ते शिंदे-फडणवीस सरकारच्या मेट्रो लोकार्पणा होणार असल्याची जाहीरात छापलेली आहे. पंतप्रधान हे आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहे. यामुळे ठाकरे गटावर भाजपकडून टीका होत आहे. एका बाजूला सामनाच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याची जाहीरात तर दुसऱ्या बाजूला सामनाच्या आजच्या (19 जानेवारी) अग्रलेखात पंतप्रधानांवर टीका केली आहे. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सत्त टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या दुतोडी भूमिकेमुळे त्यांच्यावर सत्ताधारी टीका करत आहेत.

 

सामनाच्या पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारच्या मेट्रो लोकार्पणाची जाहीरात छापली आहे. यावरून भाजपचे आमदार नितेश राणे म्हणाले, “शिवसेनेला टीका किंवा शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे गटाला टीका करण्याचा अधिकार आहे का?, तुम्ही पहिले शिवसेना म्हणायचे बंद करा, तो उद्धव ठाकरेंचा गट आहे. उद्धव ठाकरेंचा छोटाचा ग्रुप राहिलेला आहे. ठाकरे कुटुंबियांनी सरकारकडून सुरक्षा घेतलेली आहे. ते एकटे फिरत नाहीत. जे बॉडीगार्ड ठाकरे कुटुंबियांच्या आजूबाजूला फिरतात. ते महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत. हे त्यांच्या म्हणण्यानुसार घटनाबाह्य आहे. आज सामनाच्या पहिल्या पानावर सरकारची जाहीरात छापलेली आहे. तुम्हाला सरकारची सुरक्षा चालते. सरकारचा पैसा चालतो, मग हे सरकार घटनाबाह्य असल्याचे म्हण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?, मी म्हटले, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आता मुंबई महाराष्ट्रात कामच राहिलेले नाही. आणि म्हणून बॅग भरावी आणि महाराष्ट्रातून निघून जावे. कारण, इथे ना त्यांचा पक्ष राहिला, ना त्यांना कोण विचारत नाही. त्यांना लंडन फिरायला अवडते. त्यांनी जावे, तसेही बॅग उचलण्यासाठी अनिल परब आणि अनिल देसाई आहे ना”

 

दरम्यान, नुकतेच भाजपच्या प्रदेश माध्यम प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेले नवनाथ बन यांनी ठाकरे गटाच्या या भूमिकेवर ट्वीट करत टीका केली आहे. नवनाथ बन यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “सामना दैनिकात पहिल्या पानावर शिंदे-फडणवीस सरकारच्या मेट्रो लोकार्पणाच्या कार्यक्रमाची पानभर जाहिरात. हे सरकार घटनाबाह्य आहे असे म्हणणारे कार्यकारी संपादक संजूभाऊ जाहिरात प्रसिद्ध करताना रजेवर होते का? कथित घटनाबाह्य सरकारची जाहिरात चालते का?”, असे ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना टॅग केले असून #MumbaiAwaitsModiJi असा हॅशटॅगचा वापर केला आहे. 

Related posts

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk

सांगली-जळगावमधील भाजपच्या विजयावर उद्धव ठाकरेंचे टिकास्त्र

News Desk

लोकांनी विरोधात बसण्याची संधी दिली, सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडू !

News Desk