मुंबई | शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांना लगावला आहे. उद्धव स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलताना म्हणाले. यावेळी उद्धवनी राम मंदिर, काळा पैसा या मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. सरकारने राम मंदिराच्या मुद्द्याचाही जुमला करुन टाकला आहे, अशा शब्दात उद्धवनी भाजपवर टीका केली.
गेल्या आठवड्यापूर्वी लातूरमध्ये झालेल्या भाजप मेळाव्यात अमित शहांनी शिवसेनेला थेट इशारा दिला होता. मित्र पक्षसोबत आला तर ठिक, अन्यथा विरोधकांसह त्यांना धोबीपछाड देऊ, असे शहा म्हणाले होते. युती न केल्यास मित्रपक्षाला पराभूत करु, असा इशारा देताना त्यांनी पटक देंगे असे म्हटले होते. त्याला उद्धव यांनी आज (१३ जानेवारी) उत्तर दिले. शिवसेनेला पटकणारा अद्याप जन्माला आला नाही आणि येणारही नाही, असा टोला त्यांनी लगावला. सध्या हनुमानाची जात काढली जात आहे. हा प्रकार अतिशय दुर्देवी असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हणाले.
Uddhav Thackeray, Shiv Sena: Why is Lord Hanuman’s caste being discussed? If any other religions’ castes are discussed, it will be made a huge issue, but it’s okay to discuss Lord Hanuman’s caste. How sad it is. pic.twitter.com/mEPBECjFcW
— ANI (@ANI) January 13, 2019
राम मंदिराच्या निर्मितीत काँग्रेस अडथळे
सरकारसाठी राम मंदिराचा मुद्दादेखील जुमलाच आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘तुमच्या खात्यात १५ लाख येतील हा जुमला होता. मग आता राम मंदिराचा मुद्दा हादेखील निवडणुकीसाठीचा जुमला समजायचा का? राम मंदिराचा विषयही तुम्हाला जुमला वाटत असेल, तर मग जनतेने तुमच्यावर विश्वास का ठेवायचा?’ असे अनेक प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केले. काँग्रेसमुळेच राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्याचाही समाचार उद्धव यांनी घेतला. ‘राम मंदिराच्या निर्मितीत काँग्रेस अडथळे निर्माण करते, असे तुम्ही म्हणता. राम मंदिराच्या उभारणीत अडचणी निर्माण करत असल्याने देशाने त्यांना सत्तेतून खाली खेचले आणि तुम्हाला बहुमत दिले. पण तुम्ही मंदिर उभारल्याचे आम्हाला तरी दिसत नाही,’ असे उद्धव म्हणाले.
Uddhav Thackeray: They say Congress comes in between when #RamMandir issue comes up. Just because Congress comes in the middle, people punished them by taking away the majority & giving you the power. However, we don’t see any Ram Mandir built by you so far pic.twitter.com/7JXTb5akFd
— ANI (@ANI) January 13, 2019
पीक विमा योजनेवर टीका
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पीक विमा योजनेवरही टीका केली. ‘‘पंतप्रधान पीक “फसाल” योजना’’ अशा शब्दात उद्धव यांनी या योजनेची खिल्ली उडवली. ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेली व्यक्ति आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल तर ८ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करा, अशी मागणी यावेळी उद्धव यांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.