HW News Marathi
राजकारण

शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी तारीख निश्चित ?

मुंबई | शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी २० डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान, अवघ्या २ महिन्यांपूर्वी शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटीचा अपघात झाला होता. या अपघातानंतर चौकशीसाठी समिती देखील स्थापन करण्यात आली होती. अद्याप या अपघाताची चौकशी पूर्ण झालेली नसताना पुन्हा शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे.

अपघाताची चौकशी पूर्ण होण्याआधीच शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची एवढी घाई का ?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. खरंतर यापूर्वी ४ डिसेंबरलाच भूमिपूजन करण्याचे ठरविण्यात आले होते. विनायक मेटेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला तशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. मात्र इतक्या कमी कालावधीत भूमिपूजन कार्यक्रमाची तयारी होऊ शकत नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानंतर आत २० डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, उच्च न्यायालयाने शिवस्मारकाच्या प्रकल्पाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळात डच्चू देण्यात आलेले ‘ते’ ६ मंत्री नाराज ?

News Desk

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदींचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar