HW News Marathi
राजकारण

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे

अहमदनगर | अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाकळे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी व बसपा यांच्या पाठिंब्याने भाजपचे वाकळे महापौरपदी विराजमान झाले असून अहमदनगर पालिका निवडणुकीत सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागले आहे. आज (२८ डिसेंबर) सकाळी ११ वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली.

अहमदनगरमध्ये शिवसेनेचे २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. तर समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांना सेनेला पाठिंबा दिला. सेनेला एकूण २५ मते मिळाली राष्ट्रवादीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले,बाबासाहेब वाकळे, नज्जू पहिलावान हे नगरसेवक भाजपचे महापौर पदाच्या शर्यतीमध्ये होते.

सभागृहात महापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे असे दोन उमेदवार रिंगणात होते. वाकळे यांना ३७ इतकी मते मिळाली. त्यात भाजपचे १४, राष्ट्रवादीची १८, बसपा ०४ अपक्ष ०१ अशा मतांचा समावेश आहे. सेनेचे बोराटे यांना २५ इतकी मते मिळाली. श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेच्या कोट्यात मोजण्यात आले आहे. सेनेला स्वत:चे २३ व छिंदमचे १ आणि सपाचे १ असे २५ मते मिळाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

15 फेब्रुवारीपासून राष्ट्रवादी कॉग्रेसचा उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल

swarit

मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

Aprna