HW News Marathi
राजकारण

शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी देशप्रेमासाठी !

मुंबई | शिवसेना-भाजपच्या युतीनंतर शिवसेनेच्या सेना भवनाबाहेर पोस्टर्स लावून शक्ती प्रदर्शन केले आहे. “शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी देशप्रेमासाठी”, असा मजकूर लिहिलेला पोस्टर सेनाभवनाबाहेर लावण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ फेब्रुवारीला संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली होती.

हिंदुत्त्वाचा, देशप्रेमाचा मुद्दा पुढे करून पुन्हा भाजप-शिवसेनेने युतीचा निर्णय घेतला आहे. लोकसभेसाठी शिवसेनेला २३ तर भाजपला २५ जागा तर विधानसभेसाठी ५०-५० जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. गेल्या ५ वर्षात भाजपसोबत असताना देखील शिवसेनेने कायमच विरोधी पक्षाची भूमिका बजावली. परंतु, अखेर आगामी निवडणुकांसाठी हे दोन्हीही पक्ष पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. यानंतर भाजप-सेनेवर अन्य पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. आता भाजप-सेनेने शक्तिप्रदर्शन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

News Desk

पवारांनी मराठ्यांना केले शांततेचे आवाहन

News Desk

“बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा आणि आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!”, न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदेंचे ट्वीट

Aprna