HW News Marathi
राजकारण

शिवसेनेला युतीसाठी प्रस्ताव दिलेला नाही | दानवे

मुंबई | आगामी निवडणुकीत सेना भाजप युती करणार का हा प्रश्न संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातील मतदारांना पडला आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच युतीसंदर्भातील निर्णयाला कोणत्याही वेळेचे बंधन नाही गतवेळी २ दिवस आधी सेना भाजपाची युती तुटली होती. त्यामुळे अद्याप केवळ चर्चा सुरू आहे, पण कुठलाही प्रस्ताव भाजपाकडून शिवसेनेला दिला नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना भाजपा युतीचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. कारण, शिवसेनेने यंदा अजिबात युती होणार नसल्याचे जाहीर केले आहे. तर, याबाबत भाजपा प्रचंड आशावादी दिसून येते. त्यामुळे युती होणार का, या प्रश्नाच उत्तर सध्यातरी अनुत्तरीतच आहे. त्यातच, भाजपाने ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला असून स्वबळाची तयारी केल्याचे समजते. शिवसेनेला युतीबाबतचा अद्याप प्रस्ताव दिलेला नाही, प्रस्ताव देऊन लवकरच बोलणी सुरू होईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Results2018 : चंद्रशेखर राव ५० हजार मतांनी विजयी

News Desk

भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन !

News Desk

सरकार तुमचे मग राम मंदिर का नाही?

News Desk