मुंबई | हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (१७ नोव्हेंबर) ७ वा स्मृतीदिन आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. “बाळासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान आणि हिंदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिला”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या निकालांपासून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेला प्रचंड तणाव अद्यापही तसाच कायम असल्याचे यातून दिसून येत आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: Undoubtedly, the government that we are going to form in Maharashtra will be under the leadership of a Chief Minister of Shiv Sena. pic.twitter.com/RU8Rrw68vi
— ANI (@ANI) November 16, 2019
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एका व्हिडीओच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत फडणवीसांनी शिवसेनेलाच बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या शिकवणीची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. “सर्व विषयांवर योग्य वेळी उत्तर मिळतील. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. कोणीही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही”, असे शब्दांत संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावले आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आज राज्यभरातून अनेक शिवसैनिक तसेच अनेक राजकीय पक्षांचे बडे नेते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला ! pic.twitter.com/sPdALKDlzS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2019
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर गेल्या २५ वर्षांपासून असलेली भाजप-शिवसेनेची राज्यातील युती यंदाच्या विधानसभेनंतर तुटल्यात जमा आहे. आता फक्त युती तुटल्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. त्याचप्रमाणे, राज्यात लवकरच काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना अशी नवी समीकरणे बनण्यास देखील सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेलाच ‘बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या शिकवणीची’आठवण करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचेच दिसून येत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.