HW News Marathi
राजकारण

गोड बोलून त्यांनी आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला !

मुंबई | विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून मागे हटण्याचे नाव घेत नाहीये. शनिवारी (९ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपणार असून त्याच्या एक दिवसपूर्वीच आज (८ नोव्हेंबर) नुकताच फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. दरम्यान यावेळी फडणवीसांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना नेमके काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

  • थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषद पाहून काळजी वाटली
  • गेल्या ५ वर्षांत त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो.
  • मी शब्द देण्यापूर्वी एकदा नाही तर लाख वेळा विचार करतो
  • पण मी एकदा शब्द दिला कि तो मागे घेत नाही
  • शिवसेना पक्षप्रमुखांच्या मुलावरती म्हणजे माझ्यावरती पहिल्यांदा कोणीतरी खोटेपणाचे आरोप केले
  • जनता पुरेपूर जाणून आहे कि कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतो
  • नोटबंदीनंतर ५० दिवसांच्या दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ? ते आश्वासन खोटं होते.

    खोटं बोलण्याची कला भाजपकडे

  • लोकसभेवेळी मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शाह-देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते
  • उपमुख्यमंत्रीपदासाठी विचारण्यात आले होते. तेव्हा मी म्हटले होते कि, उपमुख्यमंत्रीपदासाठी मी लाचार होणार नाही.
  • शिवसेनेचे मुख्यमंत्री हे मी बाळासाहेबांना दिलेले वचन.
  • अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचे वचन अमित शहांनी लोकसभेवेळी झालेल्या चर्चेदरम्यान मला दिले आहे. त्यानंतर ते फडणवीसांना सांगण्यात आले होते. फडणवीस तेव्हा म्हणाले होते कि, “ठीक आहे. फक्त आता आपण स्पष्ट याबाबत खुलासा केला तर माझ्या पक्षातून मला अडचणी निर्माण होतील.” म्हणून पत्रकार परिषदेत ते म्हणाले, “पदांचे आणि अधिकारांचे समसमान वाटप”
  • आता त्यांनी गोड बोलून आम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला
  • देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती.
  • मी शिवसैनिकांसमोर खोटारडा म्हणून जाणार नाही.
  • होय, मी चर्चा थांबविली
  • ‘पद’ या शब्दसमोर ‘मुख्यमंत्री’ आलंच
  • असं काही ठरलंच नाही असे म्हणणार असतील तर आम्ही ते स्वीकारणार नाही.
  • अवजड उद्योगाचे खाते शिवसेनेच्या गळ्यात मारलं
  • वेळ मारून नेत्यासाठी मी खोटं बोलणार नाही.
  • खोटे बोलणे हा शिवसेनेचा स्वभावच नाही
  • आम्ही कधी मोदीजींवर टीका केली ?
  • भाजपची अडचण समजून घेतली, कमी जागा स्वीकारल्या हा गुन्हा ?
  • भाजपला शत्रू मानत नाही पण खोटं बोलू नये
  • मोदी मला लहान भाऊ मानतात
  • मी जनतेची बाजू मांडत राहिलो
  • सत्तेचं स्वप्न माणसांना किती वेडं करते.
  • महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनविण्याचे काम त्यांनी थांबविले पाहिजे
  • शब्द देऊनही फिरणारी आमची वृत्ती नाही
  • ठरलं होतं पण ते देत नाही, असे स्पष्ट सांगा
  • गंगेचे सोडा पण मन कलुषित झाली
  • मला वाईट वाटतंय, कि खूप चुकीच्या माणसांसोबत आम्ही उगाचच गेलो.
  • आरएसएसला विचारावं कि खोटं बोलणं कोणती हिंदुत्त्ववादी संघटना शिकवते ? खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्त्वाच्या बसते ?
  • अयोध्येचा निकाल हा सर्वोच्च न्यायालय लावणार आहे. त्यात सरकारचा काहीही संबंध नाही.
  • तुम्ही आमच्यावर पाळत ठेवता ?
  • शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासाठी भाजपची गरज नाही.
  • होय, मला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. पण मी प्रत्युत्तर दिले नाही.
  • खोटारडेपणा मान्य करत नाही तोपर्यंत चर्चा नाही.
  • सत्तास्थापनेचा दावा करा अन्यथा पर्याय खुले आहेत.
  • मला खोटं ठरवणाऱ्यांशी बोलणार नाही
  • अद्याप काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा केलेली नाही. पण भाजपची इच्छा असेल तर त्यांनी सांगावे.
  • महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडू शकत नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा DJ च्या तालावर ‘धांगडधिंगा’!; कोरोना नियमांना हरताळ

News Desk

सर्जिकल स्ट्राईकचे चाललेले राजकारण थांबले तरी पुरे | ठाकरे

News Desk

काँग्रेसनंतर आता ‘नमो अ‍ॅप’शी संबंधित १५ पेजेसवर देखील कारवाई

News Desk