HW News Marathi
राजकारण

राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे !

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात अयोध्येवारीची घोषणा केली होती. त्यांनतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करून शिवसेनेला डिवचले. मात्र या पोस्टरला शिवसेनेनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. मनसे विरोधात केलेल्या पोस्टरबाजीत टोल आंदोलनाला सेटिंगवाले टोल आंदोलन असा शब्द वापरण्यात आला आहे. “राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे आणि जगाला सल्ले देण्याचे यांचे धंदे,” असे म्हणत राज ठाकरेंवरच जोरदार टीका केली आहे. पाक कलाकरांच्या विरोधाच्या नावे खुलेआम सेटिंग करण्यात आल्याचेही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?, शेती मालाला हमी भाव मिळणार का?, महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?, मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?, महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? आणि खिशातले राजीनामे बाहेर पडणार का? असे प्रश्न मनसेने त्यांच्या पोस्टरमधून शिवसेनेला विचारले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यातील विकासकामे गुजरात, कर्नाटकची आहेत का? अजित पवारांचा ‘ईडी’ सरकारला संतप्त सवाल…

Aprna

काँग्रेसने दिग्गज नेत्यांमधील वाद सोडविण्यासाठी नेमली त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar

न्यायमूर्ती लोयाच्या हत्येचा केसची सुनावणी सुप्रीम कोर्टात

swarit
देश / विदेश

इंधनाच्या किंमतींमध्ये पुन्हा कपात

Gauri Tilekar

मुंबई | देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये आज (रविवारी) सलग चौथ्या दिवशी कपात झाली आहे. मुंबईत पेट्रोल २५ पैशांनी, तर डिझेल १८ पैशांनी एवढे स्वस्त झाले आहे. मुंबईत पेट्रोलची प्रतिलिटर किंमत ८७.२१ रुपये, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७८.८२ रुपये एवढी झाली आहे.

तर राजधानी दिल्लीतही पेट्रोल २५ पैसे आणि डिझेल १७ पैसे स्वस्त झाले आहेत. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत प्रतिलिटर पेट्रोल ८१.७४ रुपये तर डिझेल प्रतिलिटर किंमत ७५.१९ एवढी झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी भारतीय चलनाची घसरण आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ याचा परिणाम देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती.

मात्र देशात गेल्या अनेक दिवसांत दर दिवशी होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला होता. देशातील अनेक राज्यांत पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी ओलांडली होती. केंद्र आणि राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनकपातीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच असल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती.

Related posts

मोठ्या शहरातील महामार्गावर चालवता येणार वाइनशॉप, बिअरबार

News Desk

LIVE UPDATE | काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद

News Desk

तृप्ती देसाई लवकरच शबरीमला मंदिरात प्रवेश करणार

News Desk