HW News Marathi
राजकारण

युतीसाठी शिवसेनेने सुचविलेला १९९५चा फॉर्म्युला भाजपला मान्य होणार ?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. देशातील राजकीय पक्षांकडून आता निवडणुकांसाठी तयारीला देखील सुरुवात झाली आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी (११ फेब्रुवारी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन जागा वाटपाची चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांनी १९९५ च्या जागावाटपाचा फॉर्म्युला सुचविल्याची माहिती मिळत आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अमित शहांचा प्रस्ताव हा लोकसभा निवडणुकांपुरताच असला तरी विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे असा उद्धव ठाकरेंचा आग्रह आहे. शिवसेनेने १९९५ मध्ये विधानसभेच्या १७१ आणि भाजपने ११७ जागा लढवल्या होत्या. त्यावेळी राज्यात १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार स्थापन झाले होते. दरम्यान, शिवसेनेकडून सुचविण्यात आलेल्या फॉर्म्युल्यानुसार राज्यात युतीचे सरकार आले तर राज्याचा मुख्यमंत्री हा सेनेचा असेल. शिवसेनेच्या या भूमिकेवरून शिवसेने आपली “मोठ्या भावाची” प्रतिमा कायम ठेवण्यास प्रयत्नशील आहे. मात्र, भाजप यासाठी तयार होणार का ? हा मोठा प्रश्न आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकारच्या अग्निपरीक्षेला सुरुवात

News Desk

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य तारिक अन्वर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

राममंदिर बाजूला ठेवून पुतळ्याचे लॉलीपॉप, हिंदूंनी सावध राहावे!

swarit