HW News Marathi
राजकारण

शिवसेनेची भूमिका भाजपच्या प्रेयसीसारखी !

मुंबई । सध्या शिवसेना भाजपची प्रेयसी म्हणून भूमिका बजावत आहे, अशी बोचरी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ते पालघरमध्ये त्यांच्या ‘सत्ता संपादन संकल्प’ सभेत बोलत होते. काँग्रेस जोपर्यंत संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याचा आराखडा देत नाही, त्यांच्या विरोधात लढण्याचे जाहीर करीत नाही तोपर्यत आम्ही काँग्रेसशी कोणतीही चर्चा करणार नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

अद्यापपर्यंत आदिवासींच्या विकासासाठी खर्च झालेल्या तब्बल १४ हजार कोटींच्या निधीत पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण दूर झाले असते. परंतु समस्या ‘जैसे थे’ आहे. मग या एवढ्या निधीचे काय केले ?, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप पुन्हा सत्तेत येईल असे वाटत नसल्याचे देखील आंबेडकर यावेळी म्हणाले.

पालघरमध्ये प्रकाश आंबेडकर आणि एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या ‘सत्ता संपादन संकल्प’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, या सभेला ओवेसी मात्र उपस्थित नव्हते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राज्यसभेतही सवर्णांच्या आरक्षणाचे विधेयक मंजूर होईल, अशी आशा !

Gauri Tilekar

भुजबळ समर्थक राज दरबारी

News Desk

एअर स्ट्राईकचे पुरावे मागितल्याने दिग्विजय सिंह यांच्यावर मोठी टीका

News Desk